शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा रत्नागिरी राष्ट्रवादीकडून निषेध

रत्नागिरी:-शरद पवार साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है, भ्याड हल्ल्याचा निषेध असो अशा घोषणा देत रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत जयस्तंभावर निदर्शने केली. सिल्हर ओकवर हल्ला करणार्‍यांना कडक शिक्षा करा अशीही मागणी कार्यकर्त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद रत्नागरीतही उमटले. शनिवारी सायंकाळी जयस्तंभ येथे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रांतीक सदस्य बशीर मुर्तुझा, शहराध्यक्ष निलेश भोसले, युवक प्रदेश सचिव बंटी वणजु, प्रदिप साळवी, नेहाली नागवेकर, शमिम नाईक, साइजित शिवलकर, बबलू तोडणकर, सईद पावसकर, सुरज शेट्ये, सिध्देश शिवलकर, दुरदाना प्रभुलकर, सनिफ गावाणकर, रणजित शिर्के, नझिर वाडकर, यशवंत डोर्लेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांना चिथावणी देणारे कोण आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी तालुकाध्यक्ष सुर्वे यांनी आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या पाठीशी कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने उभा राहीला आहे सरकारने त्यांच्या अनेक मागण्या यापुर्वीच मान्य केल्या आहेत. असे असताना अचानक मोठा जमाव साहेबांच्या घरावर चाल करून जाणे म्हणजे एक नियोजनबध्द केलेला भ्याड हल्ला असल्याचे तालुका अध्यक्ष त्यांनी सांगितले. अंदोलकांना ज्यानी कोणी भडकवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशाप्रकारचा भ्याड हल्ला करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही.