व्यायाम शाळेतून घरी परतलेल्या साळवी स्टॉप येथील तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

रत्नागिरी:- व्यायाम शाळेतून घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वा. घडली.

शशिकांत सखाराम पेंढारी (31, रा. सुयश अपार्टमेंट साळवी स्टॉप, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 9 वा. तो शांतीनगर येथील सरकारी व्यायाम शाळेत व्यायाम करण्यासाठी गेला होता.10 वा. घरी आल्यावर अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.