रत्नागिरी:- पावस येथील अनुसुया आनंदी महिला वृद्धाश्रमाला वैश्य युवाकडून अनोखी दिवाळी भेट देण्यात आली. वृद्धाश्रमाला नवीन 15 बेड देण्यात आले. नवे बेड मिळाल्यानंतर त्या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सामाजिक उपक्रम राबवून वैश्य युवा संघटनेच्यावतीने दिवाळी सणाची सुरवात करण्यात आली. प्रथमच वृद्धाश्रमात दिवाळी सण साजरा करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या आगळ्या वेगळ्या भेटीने वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केल्याबद्दल संस्थाचालकांनी वैश्य युवा चे आभार मानले.
या कार्यक्रमाला वीरेंद्र वणजु, सौरभ मलुष्टे, कुंतल खातू, अभिज्ञ वणजू, प्रसाद बाष्ट्ये, वेदांग मलुष्टे, अनिश् खातु, संजोग उर्फ दादा दळी, मुकुल मलुष्टे, प्रथमेश शेट्ये, युवराज शेट्ये, सुमित संसारे, नागेश जागूष्टे, स्वप्निल दळी, स्वप्निल पाथरे, ऋषीराज धुंदूर, मनोर दळी हे युवा सदस्य उपस्थित होते.पावस येथील वृद्धाश्रमात वृद्ध महिलांसाठी आवश्यक असलेले बेड वैश्य युवा संघटना रत्नागिरी चे वीरेंद्र वणजू ,सौरभ मलूष्टे,संयोग उर्फ दादा दळी,हेमंत वणजु ,मिलिंद दळी, सचिन केसरकर ,केतन शेट्ये,वक्रतुंड शेट्ये,हरेश वणजु,अभिज्ञ वणजु,मयूर दळी, मनोर दळी, स्वप्निल दळी, राजा बामणे, सुमित संसारे,साहिल रेडीज, मुकुल मलूष्टे, कुणाल मलूष्टे,समीर रेडीज,तपन मलूष्टे, प्रथमेश शेट्ये ,प्रसाद बाष्टे , कुंतल खातू ,निलांकन देवळेकर यांनी देणगी म्हणून दिले आणि एकाच वेळी वृद्धाश्रमात आवशयक असलेले सर्व बेड मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले आणि वैश्य युवा संघटनेच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिले.