रत्नागिरी:- रत्नागिरी बाजारपेठ व शहरातील अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवेत नसलेली तसेच शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने नियमबाह्य पद्धतीने उघडी ठेवल्याप्रकरणी 6 दुकानदारांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई सोमवारी सकाळी 9 ते 6.30 वा . कालावधीत करण्यात आली. मयूर ओसवाल (33, रा.जोशी पाळंद), संदीप देवळेकर (56, रा.बाजारपेठ), अब्दुल कापडी (70, रा.राजापूरकर कॉलनी), तौफिक मंगा (रा. गवळीवाडा), इम्रान मजगावकर (रा. राजीवडा) आणि अब्दुल सावंत (60, रा.राजापूरकर कॉलनी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत. या सर्वांनी कोव्हीड -19 साथीच्या अनुषंगाने शासनाने जारी केलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आपली दुकाने नियमबाह्य पद्धतीने उघडली होती. याचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.