वृद्ध पादचाऱ्याला मोटारीची धडक; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील पिंगी मोहल्ला येथे मोटारीने पादचारी वृद्धाला धडक दिली. यामध्ये पादचारी जखमी झाला. मात्र घटनास्थळावरून मोटार चालक फरार झाला. या प्रकरणी अज्ञात मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ डिसेंबर २०२३ ला सायंकाळी सातच्या सुमारास पिंगी मोहल्ला-मिरकरवाडा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अब्दुलहमीद अली जयगडकर (वय ६५, रा. पिंगी मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) हे रस्त्याच्या कडेवरुन चालत जात असताना एका अज्ञात मोटारीने त्यांना धडक दिली. यामध्ये त्याच्या डाव्या पायाला डोक्याला व कपाळवर दुखापत झाली. मात्र अज्ञात मोटार चालकाने घटनास्थळी न थांबता तेथून पलायन केले. या प्रकरणी जयगडकर यांनी सोमवारी (ता. १५) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.