रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील वृध्दाने विहिरीच्या रहाटाला बांधलेली दोरी गळ्याला बांधून विहिरीत उडी मारत आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी सकाळी 6.30 वा.सुमारास उघडकीस आली असून ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मेहबूब इस्माईल गोरे (70,रा.आदर्श वसाहत कारवांचीवाडी,रत्नागिरी) आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे.याबाबत त्यांच्या मुलाने ग्रामीण पोलिसांना खबर दिली.त्यानुसार,गुरुवारी सकाळी मेहबूब गोरे घरात दिसून न आल्याने त्यांच्या मुलाने आजुबाजुला त्यांचा शोध घेतला असता ते घराशेजारील विहिरीत मृत अवस्थेत दिूसन आले.याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल कांबळे करत आहेत.