Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या महिलेला अधिक उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. कल्याणी केशव मालप (वय ४५, रा. आगवे-मालपवाडी, पो. तरवळ, जाकादेवी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३) दुपारी सव्वा च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्यातरी अज्ञात कारणातून कल्याणी मालप हिने गवत मारण्याचे औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मकि मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.