रत्नागिरी:- हातखंबा येथील अविवाहित तरुण पुणे येथून कामावरुन घरी आला. त्यानंतर घरात कुणालाही न सांगता बाहेर गेला. सोलगाव (ता. राजापुर) येथे त्याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अभिजित अशोक तो़डणकर (वय ३४, रा. हातखंबा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव ही घटना सोमवारी (ता. १९) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिजित हा पुणे येथून कामावरुन हातखंबा येथे आपल्या रहात्याघरी रविवारी (ता. १) सकाळी आठच्या सुमारास घरी आला. त्यानंतर तो लगेचच कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. कुठे जातो या बाबत त्याने घरच्याना सांगितले नव्हते. सायंकाळी साडेतीनच्या सुमारास त्याने सोलगाव येथे त्याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. त्याला उलट्या होऊ लागल्याने तेथील १०८ रुग्णवाहिकेने त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र सोलगाव-राजापूर येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले. अभिजित याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार दरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.