विषारी औषध खालेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- गवाणे (ता. लांजा) येथील वृद्धाने उंदिर मारण्याच्या औषधाचे कण खाल्याने अस्वस्थ झाला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. धकटू काळु कांबळे (वय ९०, रा. गवाणे, ता. लांजा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १५) ला घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी धकटू कांबळे यांनी उंदिर मारण्याचे विषारी औषधाचे दाणे खाल्ले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी (ता. १७) त्यांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.