रत्नागिरी:- रत्नागिरीतील विवाहित महिलेचा छळ केल्याचा आरोप असलेल्या पती, सासु-सासरे व दीर-भावजय यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. महिलेने शहर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार पती, सासू- सासरे व दीर-भावजय असे पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याला अटक होण्याची शक्यता लक्षात घेवून चौघांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता.
महिलेचे सासरे उमाकांत शंकर सनगर (72), सासू वर्षा उमाकांत सनगर (64, दोन्ही ऱा साळवी स्टॉप रत्नागिरी) तसेच दीर तुषार उमाकांत सनगर (43), भावजय स्मिता तुषार संनगर (41, ऱा नारायणमळी नाचणे रोड रत्नागिरी) अशी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झालेल्या चौघांची नावे आहेत तर या चौघांसह महिलेचा पती केतन उमाकांत सनगर अशी पाच जणांविरूद्ध शहर पोलिसांत भादंवि कलम 498 (अ), 324, 504, 506 सह 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.









