रत्नागिरी:- शहरातील खड्डेमय रस्ते हे शिवसेनाच चांगले करू शकते असा विश्वास सुज्ञ रत्नागिरी जनतेमध्ये आहे. विरोधकांनी सोशल मिडीयावर जुने व्हिडीओ टाकण्याचे काम सुरूच ठेवावे. त्यांच्या टिकेला कामाच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल असा टोला मंत्री सामंत यांनी विरोधकांना लगावला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत बोलत होत़े रत्नागिरीत रस्त्यांच्या कामाला 10 ऑक्टोबर पासून सुरूवात झाली आह़े असे असले दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर अधिकृतरित्या रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी कोकणनगर, मारूती मंदीर, लक्ष्मीचौक येथील कामांचा शुभारंभ होईल़ एकूण 32 कोटी रूपये शहरातील रस्ते कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत़ साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज येथील मुख्य रस्त्यांवर देखील खड्डयांच्या पॅचिंगचे काम करण्यात येत आह़े अशी माहिती सामंत यांनी दिली.
मारूती मंदीर येथील मुख्य सर्पलच्या सुभोभिकरणासाठी 2.58 कोटी रूपये मंजूर झाले आहेत़ या कामाला सुरूवात झाली आह़े कशा पकारे हे सुभोभिकरण करण्यात येणार आह़े याचे पझेंटेशन रत्नागिरीकर जनतेला करण्यात येईल़ तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे याच महिन्याच्या अखेरीस रत्नागिरीत येणार आह़े त्याच्या हस्तेच नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यकम पार पडणार आहे. असेही सामंत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
चिपळूण शहराच्या पूररेषेसंदर्भात स्थानिक व्यापारी व रहिवाशांकडून जवळपास 3 हजार तकारी पाप्त झाल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता मंत्री या नात्याने चिपळूणच्या पूररेषेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आह़े अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
उत्तरपदेशच्या लखीमपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी कडून पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद रत्नागिरीकर जनतेने दिला. यासाठी आपण येथील व्यापारी व रहिवाशांचे शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून आभार व्यक्त करतो असे सामंत यांनी सांगितले.