रत्नागिरी:- दुचाकि चालवण्याचा परवान नसताना तसेच बेदरकारपणे दुचाकि चालवून अपघात करत पाठीमागे बसलेल्या वृध्देच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची ही घटना 23 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास कापडगाव येथे घडली होती.राजेश संजय कांबळे (रा.कापडगाव बौध्दवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकि चालकाचे नाव आहे.तर या अपघातात सीमा श्रीपत कांबळे (60,रा.कापडगााव बौध्दवाडी,रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला होता.23 जानेवारी रोजी दुपारी राजेश आपल्या ताब्यातील दुचाकि (एमएच-08-एडब्ल्यू-6438) वरुन सीमा कांबळे यांना घेउन कापडगाव ते रोनीत हॉटेलकडे जाणार्या अंतर्गत रस्त्यांवरुन जात असताना त्याचा दुचाकिवरील ताबा सूटला.त्यामुळे हा अपघात होउन यात सीमा कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होउन त्यांचा मृत्यू झाला होता.याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवार 1 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









