विधान परिषद शिक्षक निवडणूकीसाठी पात्र  मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर

रत्नागिरी:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक भारत निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. या मतदारसंघासाठी मतदान ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. या मतदार संघातील मतदारांना मतदान करता यावे म्हणून निवडणुकीच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच सदर नैमत्तिक रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी श्रीकांत गायकवाड यांनी कळविले आहे.