रत्नागिरी:- राजापूरचे आमदार व शिवसेनेचे उपनेते राजन साळवी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून विधानसभेसाठी साळवी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. सेनेकडून राजन साळवी यांचा अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे.
आज विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. कित्येक वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले आमदार साळवी राज्याच्या राजकारणात एन्ट्री करणार असल्याने खऱ्या शिवसैनिकाला आता न्याय मिळणार असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.