राजापूर:- शहर बाजारपेठेत विद्युत पोलवर काम करत असताना विजेचा तिव्र धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या संतोष रामचंद्र वरक (28) रा. नाणार (मयेकर मांगर) या महावितरणच्या तांत्रीक कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी सकाळी 10.30 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान ही दुदैवी घटना घडली आहे.
भर बाजारपेठेत घडलेल्या या अपघातात एका तरूण कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अपघाती मृत्युचे कळताच महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी राजापूर ग्रामिण रूग्णालयात धाव घेतली.
सकाळी शहर बाजारपेठेत पोलवर काम करीत असताना वरक याला विजेचा धक्का बसून तो कोसळला. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारार्थ राजापूर ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यु झाला.