रत्नागिरी:- लांजा बाजारपेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहन पार्क करुन रहदारीस व वाहतूकीस अडथळा करणाऱ्या दोघा चालकांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत सिंह नायक (वय २५) व बहादूर सिंग बजारा (वय ३४, दोघेही रा. मुळ डेहरीपाल चक पो. बडागाव तेहमोमन बडोदिया शाजापूर मध्यप्रदेश, सध्या रा. पानगलेवाडी, लांजा) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना शनिवारी (ता. ९) दुपारी साडेअकराच्या सुमारास लांजा बाजारपेठ -कोत्रे हॉटेल येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालकांनी दुचाकी (क्र. एमपी ७० एमई ९५१०) व (क्र. एमपी ४२ झेडए ७८१३) या सार्वजनिक ठिकाण वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल अशा पार्क केल्या या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल संतराम पवार यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.