मंडणगड:- तालुक्यातील वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने टेम्पो पार्क करणाऱ्या चालकाविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास करण्यात आली.
अमोल मारुती ओवाळ (44, रा.वरची आळी मु.वरखवाडी ता.वाई,जि.सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल ज्ञानेश्वर पवार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,शुक्रवारी दुपारी अमोल ओवाळेने वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती. त्यामुळे इतर वाहनांना तसेच पादचाऱ्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनिमय 2023 चे कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









