वाहतुकीला अडथळा; तीन वाहन चालकांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या तीन वाहन चालकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 14 जुलै रोजी दुपारी 1.45 ते मंगळवार 15 जुलै रोजी सकाळी 10.47 वा. कालावधीत करण्यात आली.

प्रमोद दत्ताराम शेलार (45,रा.आजगे तेलीवाडी लांजा), शशांक पुर्शुराम वालांबे (38, रा.गाडीतळ, रत्नागिरी), सुलेमान अश्फाक सोलकर (45, रा.राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन वाहन चालकांची नावे आहेत. यातील प्रमोद शेलार आणि शशांक वालांबेने धनजीनाका ते मच्छिमार्केट जाणार्‍या रस्त्यार टेम्पो तर सुलेमान सोलकरने रेल्वेस्टेशन फाटा येथे महिंद्रा जितो गाडी वाहतुकील अडथळा निर्माण होईल अशा रितीने पार्क केली होती. तिन्ही चालकांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.