रत्नागिरी:- रत्नागिरी आगाराची बस अंबाजोगाई मार्गे बीड ला जात असताना एका महिलेच्या १ वर्षांच्या लहान मुलाला ताप जास्त असल्याने हृदय विकाराचा झटका आला होता. त्यावेळी रत्नागिरी आगरातील कर्तव्यदक्ष वाहक महादेव फड यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी चालकाला कुठेच न थांबता बस थेट हॉस्पिटलमध्ये घेण्यास सांगितले. त्यामुळे मुलाला तातडीचा उपचार मिळाला.
वाहक चालकाच्या कार्यतत्परतेमुळे रत्नागिरी आगारातींल आगार व्यवस्थापक श्री पाटील, स्थानक प्रमुख सौ प्रभुणे, श्री शिंदे श्री पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.