वादळाचा किनारपट्टी भागात प्रभाव; किनाऱ्यावर मोठ्या लाटा, पावसाची देखील हजेरी

रत्नागिरीः–  तोक्ते चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकत असले तरी त्याचा प्रभाव किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. समुद्र खवळला असून, लाटा किनार्‍याला धडकत आहेत. वाऱ्याचा वेग वाढला आहे. सायंकाळी 4 च्या दरम्यान चक्रीवादळ रत्नागिरी किनारपट्टीसमोरुन पुढे सरकेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.