रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-सुतारवाडी पोहायला गेलेले तीन कामगार बुडाले. आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. बुडालेल्या तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले, तर एकाचा मृतदेह हाती लागला असून एक बेपत्ता आहे. त्याचा शोध उशिरा पर्यंत सुरू होता. उत्तर प्रदेश आणि कोल्हापूर येथील हे दोघे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
विक्रम नरेशचंद्र (वय ३४ (रा. खंडाळा, मुळ उत्तर प्रदेश) हा मयत आहे. कोल्हापूर येथील ओंकार जाधव (वय २२) हा तरुण बेपत्ता आहे. तर गोपाळ नायर (वय ३५, रा. उत्तरप्रदेश) हा वाचला आहे. तेथील एका कंपनीत हे कामगार आहेत. ते वाटद-सुतारवाडी गावातील नदीत पोहायला गेले होते. त्यांना अतिउत्साह नडला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. त्यापैकी गोवाळळ नायर वाचला आणि त्याने सहकारी विक्रम नरेशचंद्र याला वाचविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. त्याला त्याने बाहेर काढले आणि खंडाला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिस, तहसीलदार राजाराम म्हात्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही या घटनेला दुजोरा दिला. बेपत्ताचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उशिरापर्यंत बेपत्ताची माहिती मिळाली नव्हती. जयगड पंचक्रोशीतील एका कंपनीच्या सब ठेकेाराकडे काम करणारे हे तीन कामगार बुधवारी वाटद येथील गाव नदीवर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला ही घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.