लांजा:- मुंबई- गोवा महामार्गावर वाकेड- बोरथडे फाटा येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने समोरून दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा एक पाय निकामी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
आपघातामध्ये निशांत वाडकर (वय- २४ रा. ठाणे) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर दुचाकीच्या मागे बसलेली सोनल राणा सिंग (वय-२५, ठाणे) ही किरकोळ जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत वाडकर व सोनल राणा सिंग हे आपल्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एमएच ०४ एमबी १९०८) घेऊन गोवाहून गणपतीपुळेच्या
दिशेने निघाले होते. दुचाकी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा माहामार्गावर बोरथडे-वाकेड फाटा येथे आली असता एका अज्ञान चारचाकीने समोरून जोरदार धडक दिली. दुचाकीला जबर धडक बसल्याने दुचाकी चालक निशांत वाडकर महामार्गावर जोरदारपणे आदळला.
आज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देऊन पलायन केले. अपघाताची माहिती स्थानिक वाकेड येथील नागरिकांना मिळताच जिजाऊ संघटना तालुकाप्रमुख योगेश पांचाळ, प्रशांत भितळे,
महेश देवरुखकर,
विजय सुवारे व अन्य ग्रामस्थांनी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था ॲम्बुलन्सला तात्काळ संपर्क साधून जखमी निशांत याला लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. या अपघाताची नोंद करण्याच्या दृष्टीने लांजा पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे.