वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कर्तबगार शेतकर्‍यांचा, कृषी शास्त्रज्ञांचा होणार सन्मान

रत्नागिरी:- हरितक्रांतीचे प्रणेते, भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दि. 18 ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणार्‍या निवडक कर्तबगार शेतकर्‍यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याची वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानची परंपरा आहे. या वर्षी देखील ही परंपरा जपली जात आहे.

वसंतराव नाईक गौरव पुरस्कारासाठी 10 प्रतिशत शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. प्रस्ताव पाठविताना दोन पासपोर्ट फोटोसह दि. 10 जुलैपर्यंत पाठविण्याचे आवाहन वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी केले
आहे. या पुरस्कार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्यात आले आहे.