गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गुरुववाडी येथील खंडाळा ते वरवडे या मुख्य मार्गावरील उतारावर मोटरसायकलस्वाराचा ताबा सुटल्याने खाली पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मनोज महादेव शिवगण वय वर्षे 32 मूळ राहणार मालगुंड शिवगणवाडी,सध्या राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा,वसाहत ता.जि.रत्नागिरी असे या तरूणाचे नाव व पत्ता आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज शिवगण हा शनिवारी 18 रोजीच सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान आपल्या मालकीची सलुटो कंपनीची मोटरसायकल घेऊन वरवडे ते खंडाळा या मुख्य मार्गाने येत असताना वरवडे गुरववाडी येथील उतारावर आल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूने काळया रंगाचा बैल आडवा आल्याने त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटला त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एम.एस.ई.बी.पोलवर जाऊन तो आदळला.तसेच त्याची मोटरसायकल ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या गटारात जाऊन पडली. यावेळी वरवडे गावचे पोलीसपाटील विजय जोशी हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या कामाच्या निमित्ताने खंडाळा येथे जात असताना त्यांना मोटरसायकलस्वार हा पडलेला दिसून आला त्यांनी जवळ पाहिजे जाऊन पाहिले असता त्याच्या नाकातून रक्त येत होते यावेळी त्यांनी नजीक असलेल्या ग्रामस्थांना हाक मारली व त्यांना बोलावून घेऊन मनोजला अपघातामध्ये काय लागले आहे का याबाबत विचारले असता त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला जोरात लागल्याने छातीत कळा मारून दुखत असल्याचे त्याने सांगितले यावेळी त्याच्या नाकातून रक्त येतच होते त्याचवेळी खंडाळ्याच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडीला वरवडे गावचे पोलीसपाटील विजय जोशी यांनी थांबवले यावेळी वरवडे येथीलच असलेल्या साहिल रामदास पालशेतकर यांच्या चारचाकी वाहनाने मनोज शिवगण याला गाडीत बसवून त्याला उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य खंडाळा येथे नेण्यात आले यावेळी मनोज शिवगण याची पत्नी प्राची शिवगण या खंडाळा प्राथमिक केंद्र येथे स्त्री परिचर म्हणून म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात आले.त्या रात्र पाळीला डूटीला होत्या.त्यांनी तात्काळ मनोजला उपचारासाठी ओपीडीमध्ये घेऊन गेल्यानंतर मनोजच्या उजव्या छातीत जोरदार दुखत असल्याचे व डोक्यामध्ये मुंग्या आल्याचे तो सांगत होता यावेळी त्याच्या नाकातून रक्त येत होते . तेथील असलेले डॉक्टर यांनी मनोज याच्यावर उपचार सुरू केले मात्र उपचारादरम्यान शनिवारी १८ रोजी रात्री 7:45 च्या दरम्यान मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मनोज शिवगण हा आपल्या पत्नीसहित खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वसाहत येथे राहत होता.आपल्या पत्नीबरोबरच मनोज हा देखील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लॅबचे काम करीत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मनोज हा अतिशय शांत व प्रेमळ स्वभावाचा होता मालगुंड शिवगणवाडी येथील विविध कला क्रीडा कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये त्याचा मोठा सहभाग असे. असा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा मनोज आकस्मिक काळाच्या पडद्याआड निघून गेल्याने संपूर्ण मालगुंड व खंडाळा परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.मालगुंड शिवगणवाडी येथील त्याच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आणल्यानंतर मालगुंड गायवाडी स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत असून त्याच्या अपघाताची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.