रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे भंडारवाडी येथे खासगी जागा पत्तन विभागाच्या बंधार्यापासून स्मशानशेडपर्यंत जोर जबरदस्तीने वरवडे गावचे सरपंच जेसीबीने रस्ता करत आहेत. हे काम करताना कांदळवनाचेही नुकसान झाली असल्याची तक्रार जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.
वरवडेतील प्रसाद पाटील, निखील बोरकर, सुनाद बोरकर यांनी केलेल्या लेखी तक्रारीत वरवडे भंडारवाडी स्मशानभूमीजवळ सरपंच रस्त्यासाठी जेसीबीने खोदाई करत होते. हे काम करताना ग्रामस्थांची कोणतीही संमती घेतली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पत्तन विभागाने खाडी किनारी बांधलेल्या संरक्षक भिंतीजवळूनच हा रस्ता वरवडे भंडारवाडा स्मशानभूमीपर्यंत खोदाई करून बनवण्यात येत आहे. हे काम करताना कांदळवनाचेही नुकसान झाले आहे. जोर जबरदस्तीने खोदकाम करून कांदळवनाचे नुकसान करणार्या जेसीबी चालक व काम करून घेणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जयगड पोलिसांकडे करण्यात आली आहे.