वरवडे- तिवरे बंदर येथील वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील तिवरी बंदर येथील वृद्धाने घराच्या पडवीच्या छताच्या लोखंडी चॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूर्यकांत सखाराम राणे (वय ८५, रा. तिवरी बंदर वरवडे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाच ते सायंकाळी साडेसात च्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुर्यकांत राणे हे घरात एकटेच रहात होते. त्यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणाने रहाते घराच्या छताच्या लोखंडी चॅनलला गळफास लावून घेतला. उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.