वन विभागाकडून खेडशी येथे खवले मांजराला जीवदान

रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी नाला येथे आढळून आलेल्या खवले मांजराला वनविभागाने जीवनदान दिले आहे. खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती केतन साळवी यांनी दूरध्वनीद्वारे दिली. त्यानंतर मानवी वस्तीत आलेल्या या खवले मांजराला वाचविण्यासाठी तत्काळ वन विभागाचे पथक तेथे दाखल झाले.पथकाने खवले मांजर ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करून ते सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यात आली त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या बचाव कार्यात पालीचे वनपाल एन.एस.गावडे, रत्नागिरीचे वनरक्षक प्रभू, साबणे, जाकादेवी वान रक्षक शर्वरी कदम यांनी सहभाग घेऊन खवले मांजर ताब्यात घेतले आणि नंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वन रक्षक रत्नागिरी आणि चिपळूण सचिन नीलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले.