लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 5 फेब्रुवारीला रत्नागिरीत

रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे दि.5 फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण येथे ते शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्री.राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख श्री.विलास चाळके, तालुकाप्रमुख श्री.प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.उद्धव ठाकरे हे दि.4 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गचा दौरा करतील. त्यानंतर दि.5 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता कणकवली येथून राजापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता राजापूर शहरातील जवाहर चौक येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता राजापूरहून श्रीदेव धुतपापेश्वर मंदिराकडे प्रयाण करतील. सकाळी 11.45 वाजता श्रीदेव धुतपापेश्वर मंदिर दर्शनज व मंदिर बांधकामाची पाहणी करतील.

दुपारी 12.15 वाजता धुतपापेश्वर मंदिर येथून पावसमार्गे रत्नागिरी शहराकडे प्रयाण करतील. दुपारी 1.45 वाजता शिवसेनेच्या आठवडाबाजार येथील कार्यालयात ते शिवसैनिकांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी 2.15 वाजता आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी 3 वाजता आ.साळवी यांच्या निवासस्थानाहून उक्षी-वांद्रीमार्गे संगमेश्वरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4.15 वाजता संगमेश्वर येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. सायंकाळी 4.30 वाजता संगमेश्वर येथून चिपळूणकडे प्रयाण करतील. सायंकाळी 5.40 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. सायंकाळी 6.15 वाजता चिपळूण येथून खेडकडे रवाना होतील. सायंकाळी 7.05 वाजता वंदे भारत एक्सप्रसने खेडहून मुंबईकडे रवाना होतील.
श्री.उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत, शिवसेना नेेते तथा आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्करशेठ जाधव, आ.वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.