मुंबई:- महाराष्ट्र खो-खो असोसिएशन नेहमीच होतकरू खो खो खेळाडूंना नेहमीच मदत करत असते. त्याचीच री ओढत मुंबईतील लालबागच्या ओम साईश्वर सेवा मंडळाने महाराष्ट्रातील ग्रामीण विभागातील १४ वर्षाखालील किशोर व किशोरी गटातील एक-एक चांगल्या व होतकरू खेळाडूंना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी ३१ व्या राष्ट्रीय किशोर-किशोरी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत ईला पुरस्कार विजेती सांगलीची सानिका चाफे व महाराष्ट्रचा कर्णधार, उस्मानाबादचा सोत्या वळवी हे दोन खेळाडू या वर्षीचे होतकरू खेळाडू ठरले असून शिष्यावृत्तीस पात्र ठरले असल्याचे ओम साईश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाटणे, सचिव श्रीकांत गायकवाड व खजिनदार सुरेश खंडागळे यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
मुंबईच्या ओम साईश्वर सेवा मंडळाने दरवर्षी (सलग पाच वर्षे) ग्रामीण विभागातील होतकरू व खो-खो क्षेत्रात चमकदार कामगिरी नोंदवणारे १४ वर्षाखालील किशोर व किशोरी गटातील खेळाडूंना प्रत्येकी रु ५०००/- (रु. पाच हजार फक्त) शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे.









