लांजा:- लांजा तालुक्यातील झापडे आणि विलवडे या दोन गावांमध्ये लागलेल्या वणव्याने मोठे नुकसान केले आहे. या वणव्यात काजू आणि आंबा बागांची लाखोंची हानी झाली असून या आगीत आंबा, काजूसह कोकमची सुमारे ८०० झाडे जळून खाक झाली आहेत.
लांजा तालुक्यातील झापडे ब्राह्मणवाडी येथील आनंद अशोक राजाध्यक्ष ( वय ४८ ) यांच्या घराशेजारील असलेल्या काजूच्या बागेला १२ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्याने आग लागली . यात त्यांची साडेतीनशे काजूची कलमे जळाली . याबाबत त्यांनी १९ जानेवारी रोजी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलिस नासिर नवलेकर करत आहेत .
विलवडे येथे दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीत पांडुरंग नारायण खामकर यांच्या काजू बागेतील ४०० काजू झाडे , १०० आंबा , कोकम दहा , बांबू १० ही झाडे जळाली . त्यांनी गुरुवारी १९ जानेवारी रोजी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .