लांजा:- लांजा तालुक्यातील भांबेड येथे मुचकुंदी नदी पात्रामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या 15, 16 वर्षीय दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 12 एप्रिल रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास घडली. मयुरी कमलेश घोसाळकर (15) सुशील गुंडाप्पा तांबळे ( 16 दोघेही राहणार गोविळ तालुका लांजा) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, भांबेड येथे मुचकुंदी नदी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीला पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागल्याने तिला वाचवण्यासाठी सोबत काठावर असलेल्या मुलाने पाण्यात उडी मारून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र खोल पाण्यात तिच्यासोबत तो ही बुडून मृत्यु झाला. घटनास्थळी लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटगुडे यांनी तात्काळ भेट दिली व पंचनामा करून मृतदेह लांजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात केली आहे.