लांजा:- तालुक्यातील कोट घडशीवाडी भेळ्याचा कोंड येथे ५० ते ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कोट भेळ्याचं कोंड येथे अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची खबर कोट गावचे पोलीस पाटील दत्ताराम गोरुळे यांनी लांजा पोलीस यांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे , हेडकाँन्स्टेबल अरविंद कांबळे , सचिन भुजबळ राव , प्रथमेश वारिक , चालक संजय जाधव यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला . मयत हा स्थानिक नसल्याचे पोलिसांनी लक्षात आल्याने या परिसरामध्ये असलेल्या चिरे खाण कामगारांना बोलावून खातरजमा केली . मात्र त्यांच्यातील कामगार नसल्याचे स्पष्ट झाले . शवविच्छेदन करण्यासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात आण्यात आले आहे . मयत हा अतिमद्य सेवन केल्याने पडल्याने त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू ओढवला असावा अशी शक्यता आहे. तसेच सहा ते सात दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवण्यात आला आहे.