लांजा:- लांजा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी रविवारी मध्यरात्री पासून अचानक आंदोलनाला सुरुवात केली आहे. अचानक पुकारलेल्या बंदमुळे लांजातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपूर्वीच कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. याला पाठींबा देण्यासाठी लांजा आगारातील कर्मचाऱ्यांनी 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपात सहभागी झाले. सर्व कामगार लांजा आगारा समोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.सकाळ पासून एसटीच्या सर्व फेऱ्या बंद असल्याने ग्रामीण भागात आणि शहरी भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. आगार प्रमुख पाटील यांनी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.