लांजा:- मुंबई – गोवा महामार्गावर आंजणारी येथे भीषण अपघात झाला. भरधाव ट्रेलरने दोन पादचारी महिलांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे.
गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
भरधाव ट्रेलरने दोन पादचारी महिलांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यातील एका ३५ वर्षे महिलेचा अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. पल्लवी प्रकाश पेंढारी (वय ३५, रा. अंजनारी पेंढारी वाडी, ता. लांजा) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग लांजाजवळ आंजणारी घाट येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रेलर (गाडी नंबर एचआर ३८ व्ही ९७९४) चालक सद्दाम हकिमुदिम अन्सारी (वय २६, रा. बिहार जि. कैमुर) या वाहनाने मुंबईकडून गोवा दिशेने जात असताना दोन पादचारी महिला यांना धडक दिली. या अपघातामध्ये पल्लवी प्रकाश पेंढारी यांचा जागीच मृत्यू झाला तर जयश्री धोंडीराम पेंढारी (वय ५२) या गंभीर जखमी झालेल्या आहेत.
गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचाराकरता खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी लांजा पोलिसांनी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली व जखमींना स्थानिकांच्या सहकार्याने मदत केली. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरु आहे. लांजा पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणाची कारवाही सुरू आहे.