लसीकरणातील अचानक बदलामुळे पटवर्धन हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ

नागरिकांचा संताप; गलथान कारभाराचा फटका 

रत्नागिरी:- लसीकरणासाठी नव्याने जाहीर केलेल्या रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथील केंद्रावर गुरुवारी (ता. 6) गोंधळ उडाला. लस घेण्यासाठी रांगा लागलेल्यांना अचानक कर्मचार्‍यांनी पन्नास दिवस झालेल्यांनाच दुसरा देणार असल्याचे सांगितले. यावरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लसीकरण कार्यक्रम आखताना नियोजन करावे अशा सुचना केल्या जात आहेत.

रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलचे केंद्र जाहीर करण्यात आले. या शाळेच्या संस्थेला ही माहीत नव्हते की इथे लसीकरण होणार आहे. सोशल मीडियावर लसीकरणाचे संदेश सगळीकडे गेल्यामुळे गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून कोविड शिल्ड लसीसाठी गर्दी केली. या केंद्रावर डोस कमी उपलब्ध होते. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना समजवण्यासाठी पोलीस मित्र व आरोग्य कर्मचारी सरसावले होते. 15 मार्च पूर्वी पहिला डोस घेतलेले 50 च्या वर लोक होती. सत्तर वर्षांवरील जेष्ठ नागरिकही या गर्दीत होते. शहरातील झाडगाव केंद्रावर 130 लोक डोस घेण्यासाठी रांगेत होते. केंद्रावर किती लस द्यायला हवी या चे नियोजन करता मग आधी ती लस कोणाला द्यायला हवी याचे ही नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केले. पटवर्धन हायस्कूलला नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. सेटअप चेंज झाला, त्यामुळे लोकांची नोंदणीही होत नव्हती. पाच दिवसानंतर 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाल्याने गर्दी होती. सकाळी रांगेत उभे राहीलेल्यांना दहा वाजता आलेल्या कर्मचार्‍यांनी पन्नास दिवसांपेक्षा अधिक काळ झालेल्यांना लशीचा दुसरा डोस दिली जाईल असे सांगण्यात आले. यावरुन रांगेत सकाळपासून उभ्या असलेल्या नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. ही बाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींपुढे मांडण्याचा काहींनी प्रयत्न केला; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.