प्रशासनाकडून दुर्लक्ष; बंदोबस्त करण्याची मागणी
रत्नागिरी:- शहरात मोकाट फिरणाऱ्या भटक्या जनावरांना लंपीची लागन झाली असून या जाणवरांच्या अंगातून पडणारे रक्त रस्तावर वाहत आहे. हा प्रकार गंभीर असून वेळीच प्रशाने या भटक्या जनावरांवर उपचार करून त्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा उपद्रव थांबवण्यासाठी त्यांना पकडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शहरात ३०० मोकाट गुरे असून, त्यापैकी २० जनावरांना लम्पी झाला आहे असे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी सांगितले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून शहरात येणाऱ्या असंख्य गुरांना लंपीची लागण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
ज्या ठिकाणी रस्त्यावर लंपीग्रस्त गुरे बसतायत त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून येत आहे. अनेक लंपीग्रस्त जनावारंची अवस्था बिकट झाली आहे. अंगावर दिसणारे फोड आणि शरीरातून पडणारे रक्त यामुळे लंपीग्रस्त जनावरे दगवण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम रविवारपासून सुरु करीत असल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरली आहे. ग्रामीण भागातून मोकाट जनावरांचे कळप शहरात येत आहेत. यातील निम्यापेक्षा जास्त जनावरांना लंपीची लागन झाली आहे. या जनावरांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर रत्नागिरी शहरात हीच मोकाट जनावरे मृत होऊन पडल्याचे दृश्य पहायला मिळणार आहे.