रेल्वे स्टेशन फाट्यानजिक गयाळवाडी येथे एसटी बसला आग; ५५ प्रवासी थोडक्यात बचावले

रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील रेल्वे स्टेशन फाट्यानजिक गयाळवाडी येथे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येणार्या एसटी बसच्या इंजिनला गाडी चालू असतानाच अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने ५५ प्रवासी थोडक्यात बचावले.सोमवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

कोल्हापूर एसटी डेपोचे चालक सुहास शिंदे हे आपल्या ताब्यातील कोल्हापूर-मलकापूरमार्गे रत्नागिरी एसटी बस घेवून वाहन एस.एस.मराठे यांच्या समावेत रत्नागिरीकडे येते होते.कोल्हापूरहून रत्नागिरीकडे प्रवास करणारे सुमारे ५५ प्रवासी बस मधून प्रवास करत होते.

सोमवारी दुपारी कारवांचीवाडी येथे काही प्रवासी उतरल्यानंतर गाडी घेवून सुहास शिंदे हे रत्नागिरीच्या दिशेने येत होते. या मार्गावरील रस्त्याचे काम सुरु असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता. अशातच गयाळवाडी येथे गाडी आल्यानंतर गिअरबॉक्स जवळून अचानक धूर येऊ लागला. गाडीमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच चालक सुहास शिंदे यांनी बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. इंजिनला आग लागल्याची कल्पना त्यांनी वाहक एस.एस.मराठे यांना दिली. त्यांनी बसच्या मागील बाजूला असलेल्या आपत्कालीन दरवाजा उघडून आतील सुमारे ५५ प्रवशांना सुखरुप बाहेर काढले.याचा कालावधित काही प्रवाशांना रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. १० मिनिटातच पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत इंजिनसह चालकाची सिट जळून खाक झाली होती. प्रवशांना आपल्याकडील बॉटलमधील पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बंबाने आगीवर पुर्णत: नियंत्रण मिळविले. त्यामुळे संपुर्ण बस आगीत खाक होण्यापासून बचावली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज भोसले. हे.कॉ. भितळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. चालक सुहास शिंदे यांनी या घटनेची माहिती एसटीच्या रत्नागिरी, कोल्हापूर विभागाला दिली. त्यानंतर रत्नागिरी आगराचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.