रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील रस्त्यावर रेल्वे ब्रीज खाली जखमी अवस्थेत अनोळखी आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) सकाळी सव्वादहाच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार यांनी बुधवारी सकाळी आरटीओ ऑफिसच्या समोर रेल्वेब्रीज जवळ अनोळखी पुरुष जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पाहणी केली असता त्याच्या पायांना जखमा झालेल्या होत्या. रुग्णवाहिकेने अनोळखीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.