राजापूर:- राजापूर रेल्वेस्टेशन ते खारेपाटण दरम्यान मोसम नलावडेवाडी येथे एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. बलराम गजेंद्र तामंग (32, भोजपूर, नेपाळ, सध्या राहणार दरबार हॉटेल वेंगर्ला) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद आरपीएफचे जवान विपुल ईश्वर म्हस्के यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिली. ही घटना 14 सप्टेंबर रोजी रात्री 11.50 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीएफ जवान विपुल म्हस्के हे डयुटीवर असताना राजापूर रेल्वेस्टेशन मास्तर यांनी फोन द्वारे कळवले की एक 30 ते 35 वर्षाचा पुरुष रेल्वेस्टेशनच्या झुडुपात मयत स्थितीत आढळून आला आहे. याबाबतची खबर मिळताच विपुल म्हस्के हे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी याबाबतची माहिती राजापूर पोलीस स्थानकात दिली.