रुग्णसंख्येत घट; जिल्ह्यात 24 तासात 103 रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे. गुरुवारी झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1003 तपासण्यांमध्ये 103 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात उपचारखाली असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 79 हजार 773 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.63 टक्के आहे. नव्याने 103 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 83 हजार 416 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 508 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 755 तर संस्थात्मक विलगीकरणात 342 रुग्ण उपचार घेत आहेत.