रुग्णसंख्या घटतीच; अवघे 80 पॉझिटिव्ह रुग्ण, दोन जणांच्या मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे. मंगळवारी झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1108 तापसण्यांमध्ये केवळ 80 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 104 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 80 हजार 424 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.91 टक्के आहे. नव्याने 80 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 83 हजार 855 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 515 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 561 तर संस्थात्मक विलगीकरणात 336 रुग्ण उपचार घेत आहेत.