रत्नागिरी:- रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध होवून जिल्हयातील आरोग्य दर्जा सुधारेल आणि आरोग्य सेवांनाही बळकटी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात आरोग्य सेवा आयुक्तालयांकडून पुरविण्यात आलेल्या 31 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम पालकमंत्री अॅड. परब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत यांनी रुग्णवाहिका चालवून प्रात्यक्षिकही केले. अध्यक्ष विक्रांत जाधव जाधव यांनी प्रास्ताविकांमध्ये प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांबाबत माहिती देतानाच ग्रामीण भागात रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री अॅड. परब म्हणाले, कोरोना काळात कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करण्यात येऊन जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी करण्यात आल्या. उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना ने-आण साठी होणारी गैरसोय दूर होवून आरोग्य यंत्रणा आणखी बळकट होईल. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविणे गरजेच आहे. तिसरी लाट येणार नाही आणि आलीच तर तिचा जास्त तीव्रता जाणून न देता ती थोपविण्यासाठी धैर्याने प्रतिकार केला पाहीजे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरली तर आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण कमी होईल. कोरोना थोपविण्यासाठी जिल्हयात टेस्टींगचे प्रमाण वाढविणे आवश्यक असून लसीकरण फार महत्वाचे आहे









