खवटी-बुरटेवाडीनजीकची घटना
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खवटी-बुरटेवाडीनजीक रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सुरज ज्ञानेश्वर तरडे (२६ रा. काटवली-सातारा) या तरुणाचा कराड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश गोपाळ दळवी (खवटी) या रिक्षाचालकावर रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शुभम ज्ञानेश्वर तरडे (२३ रा. काटवली-सातारा) याने पोलीस ठाण्यात खबर दिली. ते दोघेजण दुचाकीवरुन (एमएच१२ पीपी९९१०) प्रवास करत होते. दुचाकी खवटीजवळ आली असता रिक्षाने (एमएच ०८ व्ही ०५१४) दुचाकीला धडक दिली.
या अपघातात ज्ञानेश्वर तरडे याच्या डोक्यासह पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी कराड येथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.









