रिक्षा-दुचाकीचा अपघात; चार जण जखमी

रत्नागिरी:- शहरातील नाचणे पॉवर हाऊस बसस्टॉप येथे रिक्षा व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह तीन जण जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन संतोष नागवेकर (वय २०, रा. हातीस, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास नाचणे पॉवर हाऊस येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक लतिकेश कमलाकर भोरे (३२) हे रिक्षा (क्र. एमएच-०८ बीसी ०४९४) शेजारी संतोष तुकाराम माचिवले ५१,प्रज्वल संतोष माचिवले २२ यांना घेऊन परकार हॉस्पिटलकडे जाण्यासाठी नाचणे पॉवर हाऊस येथील आरोग्य मंदिर रस्त्यावर येत असताना संशयित स्वाराने दुचाकी (क्र. एमएच-०८ एबी ७७०५) ही निष्काळजीपणे चालवून रिक्षाच्या डाव्या बाजूला ठोकर दिली. या अपघातात रिक्षा चालक भोरे, संतोष माचिवले, प्रज्वल माचिवले व स्वतः स्वार आर्यन नागवेकर जखमी झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.