रत्नागिरी:- राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आणि मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना मयेकर यांचे शुक्रवारी निधन झाले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
चार दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालय येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांच्यावर आयसीयूत उपचार करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण शुक्रवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नानांचा दांडगा संपर्क होता. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण रत्नागिरी हळहळली. रत्नागिरीतील सर्वच क्षेत्रातील मंडळींनी नानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.









