ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार
रत्नागिरी:- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडा नंतर रत्नागिरी जिल्ह्यातही राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत रत्नागिरी तालुका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. या बंडाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादीचे महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होत आहे. या बैठकीला आम.जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कार्यकर्ता मेळाव्याचे बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी 11:30 वाजता साई मंगल कार्यालय येथे आयोजन केले असून, या मेळाव्याला राजापूर,लांजा,रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.या कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.