रत्नागिरी:- राष्ट्रवादी पक्ष संघटनेचा 23 वा वर्धापनदिन येत्या 10 जून रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त रत्नागिरीत विविध समाजोपयोगी कार्यकम घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला कुमार शेट्ये यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी रत्नागिरीत संघटनेतर्फे करण्यात येत आहे. या वर्धापनदिनानिमित्त 10 जून ते 16 जून दरम्यान विविध समाजोपयोगी कार्यकमांचे नियोजन रत्नागिरी तालुक्यात करण्यात आले आहे. 10 जून रोजी सकाळी येथील संघटना कार्यालयासमोर पक्षाच झेंडावंदन व त्यानंतर येथील आशादीप संस्थेला मदत पदान करण्याचा कार्यकम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्याचबरोबर रत्नागिरीतील समुद्र किनारी भागात राहणार्या गरजू मच्छिमार कुटुंबियांना मच्छिमारीसाठी जाळ्यांचे वाटप केले जाणार आहे. या कालावधीत रत्नागिरी शहर व तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांचे सत्कारही केले जाणार आहेत. संघटनेच्या महिला सेलतर्फे विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. युवकांमार्पत रक्तदान शिबीराचेही आयोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण असे कार्यकम या आठवडाभरात केले जातील असे सांगण्यात आले.