रायगडातील बेपत्ता प्रल्हाद तरे याचा मृतदेह परचुरी खाडीत मिळाल्याने खळबळ

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील परचुरी खाडीपात्रात रायगड तालुक्यातील नांदगाव कोळीवाडा येथील बेपत्ता झालेल्या 55 वर्षीय इस्माचा मृतदेह पाण्यावर तरंगताना गुरुवारी सकाळी दिसून आल्याने . याची माहिती परचुरी चंदरकरवाडी येथील राजेश दुदम याने संगमेश्वर पोलिसांना दिली.

परचुरी येथील खाडीपात्रात गुरुवारी पुरुष व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत आहे याची माहिती मिळताच संगमेश्वर येथील पोलिसांनी त्या ठिकाणी जात स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाडीपात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील नांदगाव कोळीवाडा येथील प्रल्हाद रामचंद्र तरे (वय वर्ष 55) हा इसम दापोली तालुक्यातील पाज पंढरी येथून मासेमारी करणाऱ्या बोटीवरून मासेमारी करण्यासाठी गेला असता 27 डिसेंबर 2024 समुद्रात मोठ्या प्रमाणात वारा सुरु झाल्याने सदरील मासेमारी करणारी बोट सुरक्षिततेसाठी कारूळ जेटीवर थांबवण्यात येऊन त्या बोटीवरच सर्व कामगार थांबलेले असताना सदरील व्यक्ती रात्रीच्या सुमारास इतर सर्व कामगार झोपी गेलेले असताना बोटीवरून निघून गेल्याची फिर्याद गुहागर पोलिस ठाण्यात दाखल होती.

बेपत्ता प्रल्हाद तरे याची फिर्याद दाखल करणारे नातेवाईक ते बेपत्ता झाल्या पासून शोध घेत होते त्यांना संगमेश्वर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात येणाऱ्या परचुरी खाडीपात्रात अनोळखी इस्माचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच त्यांनी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय गाठत त्या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणलेले मृतदेहाची पाहणी केली असता बेपत्ता प्रल्हाद तरे याचाच मृतदेह असल्याची खात्री करत तशी माहिती संगमेश्वर पोलिसांना दिली.

अपघात की घातपात?

वाऱ्यापासून बचावासाठी दापोली तालुक्यातील बोऱ्या कारूल जेटीवर नांगरून ठेवण्यात आलेल्या बोटीवरून बेपत्ता झालेल्या प्रल्हाद तरे याचा मृतदेह थेट संगमेश्वर तालुक्यातील परचुरी खाडीपात्रात एवढ्या दूर अंतरापर्यंत पाण्याच्या भरती आणि ओहटिच्या प्रवाहा बरोबर कसे वाहवत आला. तसेच हा अपघात की घातपात याचीही चर्चा सुरु आहे.