रामआळीतील शौचालयात कापडी पिशव्यांचे मशीन

रनप प्रशासनाचा आणखी एक अजब कारभार समोर

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतील प्रशासकीय राजवटीत प्रशासकीय इमले कसे बांधले गेले, याचे एक धक्कादायक उदाहरण नुकत्या झालेल्या सर्वसाधारण सभेतून समोर आले आहे. प्लास्टिक बंदीच्या नावाखाली चक्क रामआळी बाजारपेठेतील सार्वजनिक शौचालयात कापडी पिशव्यांचे मशीन बसवण्याचा अजब आणि हास्यास्पद प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे या सभेत समोर आलेल्या या प्रकाराने नगरसेवकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाया कारभारावर जोरदार ताशेरे उडवले आहेत.

‘स्वच्छ सर्वेक्षण‘ अंतर्गत मिळालेल्या निधीचा विनियोग कसा करावा, याचे भान प्रशासनाला राहिले नसल्याचे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ााााxतून समोर येत आहे. 10 लाख रुपयांची वर्क ऑर्डर काढून शहरातील राम आळी येथील सार्वजनिक शौचालयात हे ‘कॉईन ऑपरेटेड क्लोथ बॅग वेंडिंग मशीन‘ बसवण्यात आले असल्यो प्रशासनातील अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी महिलांच्या आरोग्यासाठी ‘सॅनिटरी नॅपकिन‘ मशीनची नितांत गरज होती, तिथे कापडी पिशव्यांची मशीन लावून प्रशासनाने नक्की काय साध्य केले? की केवळ ‘निधी‘ लाटण्यासाठीच हा अट्टाहास होता? असा संतप्त सवाल सभेत नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यामुळे सभेतील अधिकाऱयीं ााांगला हबेलहंडी उडाली होती.

प्रशासकीय राजवट संपताच आता एकामागून एक अजब कारभारो बिंग बाहेर फूटत आहेत. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी यापूर्वीच ‘शौचालय घोटाळा‘ उघडकीस आणला होता. आता या पिशव्यांच्या मशीन प्रकरणाने आगीत तेल ओतले आहे. बाजारपेठ किंवा गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करण्याऐवजी शौचालयात मशीन लावणे म्हणजे बुद्धीचे दिवाळे निघाल्याचे लक्षण असल्यी संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाया अधिकाऱयांवर आगपाखड केली.

10 लाखांच्या या कामात नेमकी किती मलाई खाल्ली गेली, याची चर्चा आता नगर परिषद हद्दीतील गल्लीबोळात रंगली आहे. शौचालयात जाऊन कापडी पिशवी कोण विकत घेणार? असा साधा प्रश्न सामान्य रत्नागिरीकर विचारत आहेत. प्लास्टिक बंदीची जनजागृती हा केवळ बहाणा असून, प्रत्यक्षात हा सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचाच प्रकार असल्याची टीका सर्वसाधारण सभेत संतप्त नगरसेवकांनी केली.