राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेने गुढीपाडवा शोभायात्रेत साकारलेला चित्ररथ देखावा ठरला लक्षवेधी

रत्नागिरी:-गुढी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभा यात्रेत श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेने सहभाग घेतला होता. पहिल्याचवर्षी सहभागी होत असतानाही संस्थेच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अत्यंत भावुक असा सामाजिक संदेश या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आला होता. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.आता कोरोनाच्या महामारीत डॉक्टर,पोलीस,नर्स,सफाई कर्मचारी यांनी देखील नागरिकांच्या रक्षणाचा गोवर्धन पर्वत उचलून धरल्या प्रमाणे कार्य केले आणि कोरोना पासून देश मुक्त केला असा देखावा या चित्र रथाच्या माध्यमातून साकारण्यात आला होता.

देव प्रत्येक युगात वेगवेगळ्या रूपात येऊन भक्तांच्या मदतीला नेहमीच धावतो. फक्त आपल्याला त्याच रूप ओळखता आला पाहिजे असा संदेश ह्या देखाव्यातून देण्यात आला होता. या शोभायात्रेत श्री राधाकृष्ण मंदिर संस्थेचे तसेच वैश्य युवा चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.